आपली भाषा निवडा English (US) | मराठी


शाळा सुरु करण्यामागचा हेतु

 • विद्यार्थीना विनामूल्य शिक्षण उपलब्ध करून देणे.
 • माध्यमिक शाळेचे सर्व हेतू साध्य करणे.
 • संगणक, विज्ञान, सांस्कृतिक, स्पर्धा, प्रकल्प, चर्चा, उपक्रम या आणि अशा इतर अनेक सर्व गोष्टींची आवड असलेल्या विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करणे.
 • तालुका, जिल्हा, राज्य आणि यासह राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांना यश मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करणे
 • कौशल्य प्रकल्प सुरू करणे आणि यासोबतच भविष्यात कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याचाही मानस आहे
 • पालक आणि इतर ग्रामस्थ यांच्या मदतीने शैक्षणिक क्षेत्रात जास्तीत जास्त प्रगती करणे
 • शैक्षणिक प्रकल्प असणाऱ्या ठिकाणी भेट देणे.
 • शाळेच्या विकासासाठी शाळेची सहल आणि गट चर्चा आयोजित करणे.
 • डिजिटल आणि प्रोजेक्टर सिस्टम च्या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक युगाची आणि तंत्रज्ञानाची ओळख करून देणे


शाळेच्या गरजा आणि भविष्यातील योजना

 • सद्यस्थितीत शाळेचे सर्व वर्ग एका मोठ्या हॉलमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे विभाजन करून भरविले जातात. तर भविष्यात कायमस्वरूपी इमारत उभी करणे किंवा कायमस्वरूपी भिंतीची निर्मिती करून वर्गखोल्या आणि कार्यालय तयार करणे गरजेचे आहे. .
 • सध्या संगणक युग असल्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक आणि इंटरनेट सुविधा देणे हीसुद्धा शाळेची गरज आहे. शाळेच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता या गोष्टी सहज करणे शाळेला शक्य नसल्यामुळे दानशूर व्यक्तीनी या कार्यात सहकार्य करावे अशी विनंती या माध्यमातून आपणा सर्वाना शाळेच्या वतीने आम्ही करीत आहोत.
 • शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांसाठी एस टी बस किंवा अन्य वाहनांची सोय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे .
 • टेबल, खुर्च्या, कपाट, बेंच इत्यादी शाळा सुविधा पुरविणे.
 • विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व सांस्कृतिक उपक्रमांचे प्रशिक्षण देणे
 • शिक्षक व कर्मचाऱ्यांना शालेय उपक्रमांचे प्रशिक्षण देणे.
 • पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश, प्रवासी पास विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे
 • गरीब आणि गरजू विद्यार्थी ज्यांनी शिक्षण अर्धवट सोडले आहे अशा सर्वांचे सर्वेक्षण करून त्यांना पुढील शिक्षणासाठी किंवा खंडित शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन आणि मदत करणे
 • जे विद्यार्थी/विद्यार्थिनी ३ किंवा ३ पेक्षा जास्त किमी अंतर चालत शाळेमध्ये येतात अशा सर्व विद्यार्थी/विद्यार्थिनींना प्रवासासाठी "सायकल" पुरविणे
 • शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन देणे
 • शालेय अभ्यासक्रमासोबतच इतर गोष्टी म्हणजेच संगणक, चित्रकला , योग आणि शारीरिक शिक्षण यासारख्या गोष्टींसाठी तात्पुरते शिक्षक नेमणे
 • विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल प्रेरित करणे.
 • ई-शिक्षण प्रकल्प प्रणालीच्या पद्धती वापरणे.
 • विद्यार्थी व शिक्षकांना पुरेशी फर्निचर पुरविणे.
 • इतर विभाग ग्रंथालय, प्रयोगशाळा (विज्ञान) विकसित करणे
 • स्वछतागृहांचे प्रमाण वाढवणे.
 • अपघाती निधी आणि प्राथमिक उपचार प्रदान करणे.
 • शाळेच्या परिसराचे सुशोभीकरण करणे.