आपली भाषा निवडा English (US) | मराठी


विद्यादान हाच आमचा आनंद

अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या सामान्य कष्टकरी लोकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि त्यांना त्यांचा "शिक्षणाचा अधिकार" मिळावा या उद्देशाने चालू केलेले हे विद्यालय आज खुडी गावातील नागरिक स्वकष्टाने उभ्या केलेल्या निधीतून चालवत आहेत.या विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आज गावासोबतच अनेक ज्ञात अज्ञात व्यक्ती देश विदेशातून हातभार लावत आहेत. त्या सर्वांच्या विश्वासास पात्र होण्यासाठी "विद्यालय" आजपर्यंत झटत आले आणि यापुढेही राहील !

शाळेची उद्दिष्टे


  • विशेषत: खुडी गावात व सर्वसाधारणपणे देवगड तालुक्यातील इच्छुक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लावणे.
  • कला,सांस्कृतिक,साहित्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यावसायिक कौशल्य, उद्योग, संरक्षण, कृषी आणि फलोत्पादन इत्यादी विविध विषयांत शैक्षणिक संस्कृती वाढविणे.
  • माहितीपूर्ण आणि कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्याचा विद्यालयाचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

शाळेचे ध्येय


आमचे हे स्वप्न प्रत्यक्षात रूपांतरित करण्यासाठी तसेच शालेय इमारतीच्या बांधकामासाठी आणि त्यातील दैनंदिन खर्च चालविण्यासाठी पुरेसा निधी आवश्यक असणे आवश्यक आहे .

याचे प्रमुख कारण म्हणजे पुढील ८ ते १० वर्षासाठी यासंदर्भात कोणतेही शासकीय शुल्क मिळण्याची दूरस्थ शक्यता आहे.


शाळेची रचना


  डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी, मुंबई या संस्थेमार्फत सुरु केल्या जाणाऱ्या या उपक्रमासाठी सर्व ग्रामस्थानी मुख्य रस्ता नजीक असणाऱ्या ठिकाणची  मध्यवर्ती इमारत देऊन सर्वप्रथम आपले सामाजिक कर्तव्य बजावले .
यानुसार डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी, मुंबई  यांनी खुडी ग्रामस्थ व मौजे खुडी ग्राम विकास मंडळ, मुंबई यांच्या मागणीनुसार ‘खुडी माध्यमिक विद्यालय' सुरू केले  .
आमच्या शाळेत शाळेच्या क्रियाकल्पासाठी अंदाजे ७००० चौरस फुट जमीन आहे.

आमचे आवाहन


  आजवर आम्हाला आलेल्या अनुभवानुसार आणि आम्ही केलेल्या कामानुसार आम्हाला पुढल्या ५ वर्षात प्रत्येक वर्षी १० लाख रुपयांप्रमाणे  अंदाजे ५० लाख रुपयांची गरज आहे. आणि शाळेच्या या आमच्या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी अंदाजे १ कोटी रुपये.
परंतु सद्यस्थितीत आम्हाला  कर्मचाऱ्यांचा पगार, मासिक बिल तसेच वीज, पाणी, पत्रव्यवहार आणि प्रवास यासारख्या चालू खर्चाची पूर्तता करण्यासाठी ५ लाखांची गरज आहे. या आमच्या कार्यात आपणही सहभागी व्हावे असे आपल्या सर्वाना शाळेच्या वतीने आवाहन करत आहोत 

खुडी-भौगोलिक रचना


डोंगराळ प्रदेश.
पर्यटन जिल्हा "सिंधुदुर्ग" मधील छोटेसे गाव.
दळणवळणाच्या सोयी अत्यल्प.
बहुतांश पालक हे शेतकरी, कामगार, आणि छोटेखानी व्यावसायिक

साहाय्य
खुडी ग्रामविकास मंडळ, मुंबई.
खुडी शिक्षण प्रसारक मंडळ, खुडी.