आपली भाषा निवडा English (US) | मराठी

उद्घाटन

११ जून २०११

खुडी माध्यमिक विद्यालय "खुडी ग्रामस्थ" तसेच "खुडी ग्राम विकास मंडळ मुंबई" यांच्या मोठ्या अपेक्षेने आणि अथक प्रयत्नांनंतर सुरू झाले आहे . सुरुवातीला डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी, मुंबई ने आपल्या नावाने शैक्षणिक उपक्रम सुरू केला. मात्र सध्या ग्रामस्थ आणि समाजातील दानशूर व्यक्तिंच्या सहकार्याने "विद्यालयाच्या दैनंदिन कामासाठी" लागणारा सर्व खर्च केला जातो. 

२०१६-१७ पासून शाळेला मान्यता मिळाली आहे


  "खुडी" गाव देवगडपासून २८ कि.मी. कणकवली येथून २७ कि.मी. तर मालवण पासून ३८ कि.मी. आहे .मुख्यत्वे देवगड तालुक्यात असणाऱ्या या गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे . चहूबाजूला डोंगररांगा आणि त्यांच्या कुशीत वसलेले असे हे गाव असून गावातील बहुतांश लोक शेतकरी, मजूर, छोटे व्यापारी आहेत. 
मुळात या शाळेच्या स्थापनेपूर्वी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शेजारील गावी जावे लागत असे ज्याचे अंतर साधरणतः ८ ते १० कि. मी आहे. विद्यार्थ्यांना प्रवासाच्या सोयी व्यवस्थित नसल्यामुळे बहुतेक विद्यार्थी पायी जायचे. 
काही विद्यार्थ्यांना परिस्थितीअभावी शिक्षण घेणे सुद्धा कठीण झाले होते. या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपल्या गावातच एखादी माध्यमिक शाळा सुरु करावी हा हेतू  डोळ्यासमोर ठेवून या शाळेची स्थापना करण्यात आली. 

आम्ही एकत्र येण्यामागचा उद्देश !

  आमच्या खुडी गावातील प्राथमिक शाळेचा आम्हाला अभिमान आहे. परंतु गेली अनेक दशके माध्यमिक शिक्षणासाठी आमची मुले दुसऱ्या गावी दररोज पायपीट करत होती ही गोष्ट आम्हा सर्वांच्या मनाला थोडीशी खटकत होती. 

आमच्या गावातील बरेचसे लोक या आणि अशा अनेक असुविधांमुळे तसेच नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी जाऊन स्थायिक झाले होते . परंतु इथल्या स्थायिक लोकांना शेवटी हा प्रश्न होताच कि ज्या हालअपेष्टा आपण लहानपणी सहन केल्या त्याचं आपल्या पुढच्या पिढीनेही सहन करायच्या का ? यांच्या शिक्षणासाठी आपण आपल्या स्थानिक पातळीवर काही करू शकतो का ? 

तर या आणि अशा समान विचारांच्या लोकांना एकत्र घेऊन शेवटी सर्वानुमते "शाळा" स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. आज बहुतांश विद्यार्थी या शाळेत शिकत असून आमच्या मुलांचे कष्ट या विद्यालयामुळे खूप कमी झाले आहेत आणि आज आम्हाला या गोष्टीचा खरंच खूप अभिमान वाटतो!

शाळेची उद्दिष्टे

  • विशेषत: खुडी गावात व सर्वसाधारणपणे देवगड तालुक्यातील इच्छुक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लावणे.
  • कला,सांस्कृतिक,साहित्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यावसायिक कौशल्य, उद्योग, संरक्षण, कृषी आणि फलोत्पादन इत्यादी विविध विषयांत शैक्षणिक संस्कृती वाढविणे.
  • माहितीपूर्ण आणि कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्याचा विद्यालयाचा प्रामाणिक प्रयत्न आहे.